'रेल्वे परीक्षेसाठी जास्तीत जास्त मराठी उमेदवारांनी अर्ज भरावेत'

22/07/2011 15:37

 

मुंबई - रेल्वेच्या नोकर भरतीत नेहमीच महाराष्ट्रातील मराठी उमेदवारांना डावलण्यात येते; पण आता यापुढे असे होणार नाही. लवकरच महाराष्ट्रातून सुमारे दहा हजार जागांवर भरती होणार असून, या परीक्षेसाठी जास्तीतजास्त मराठी उमेदवारांनी अर्ज भरावेत. मराठी मुलांनी यासाठी अधिकाधिक रेटा लावला तर मराठी उमेदवारांना कोणी नाकारणार नाही, त्यासाठी अर्ज कसा भरायचा...अर्जासोबत काय जोडावे याची काळजी घ्या, असे आवाहन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज केले. पण रेल्वे परीक्षेचे अर्ज भरताना नीट काळजी घ्या व नंतर बोलू नका, असेही राज यांनी ठणकावले.

मनसेच्या राज्यातील सर्व पदाधिकाऱ्यांची बैठक आज राज यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली. या वेळी मध्य रेल्वे व पश्‍चिम रेल्वेच्या 2010-11 च्या संपूर्ण रेल्वे भरतीप्रक्रियेच्या माहिती पुस्तिकेचे प्रकाशन राज यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी बोलताना ते म्हणाले की, रेल्वेच्या भरतीत नेहमीच मराठी उमेदवारांना डावलण्यात येते, ही आजवरची प्रथा आहे. त्यासाठी आंदोलने करावी लागतात. शिवसेनेत असतानाही आपण अशी आंदोलने केली होती. केंद्रात लालूप्रसाद यादव व रामविलास पासवानांसारखे मंत्री सत्तेत असताना त्यांच्या राजकारणामुळे नेहमीच मराठी उमेदवारांना डावलण्यात आले. पण, रेल्वेमंत्री ममता बॅनर्जी यांनी रेल्वे परीक्षा स्थानिक मातृभाषेतून घेण्याचा आदेश दिल्यामुळे त्या-त्या राज्यांतील भूमिपुत्रांचे आता भले होईल, असा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला


solapur pune pravasi sangatana