अंधेरीच्या दोघांचा एक्स्प्रेस वेवर मृत्यू

02/09/2011 17:13

पुणे-मुंबई एक्स्प्रेस हायवे वर सोमाटणेजवळ अज्ञात वाहनाच्या धडकेने एकाच कुटुंबातील दोन जण ठार तर दोन जण जखमी झाले आहेत. मुंबईहून पुण्याला येणाऱ्या मार्गावर बुधवारी दुपारी साडेचारच्या दरम्यान हा अपघात झाला.

डॉ. सरोज विनोद भट (वय ६०) आणि आरोही आशिष भट (वय ३ वर्षे) अशी अपघातात मरण पावलेल्यांची नावे आहेत. तर डॉ. आशिष विनोद भट (वय ३०) आणि डॉ. रिक्ता आशिष भट (वय २५, सर्वजण रा. पंचरत्न सोसायटी, पंचमार्ग, अंधेरी, मुंबई-२९) हे अपघातात गंभीर जखमी झाले आहेत. जखमींवर निगडीतील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भट यांचे अंधेरी येथे हॉस्पिटल आहे. ते काही कामानिमित्त मुंबईहून पुण्याकडे येत होते. सोमाटणेजवळ किलोमीटर क्रमांक ८८/१२ येथे हा अपघात झाला. अज्ञात वाहनाची मागून धडक बसल्याने भट यांची गाडी १०० फूट खोल दरीत कोसळली. गाडीचा चेंदामेंदा झाला. त्यात दोघांचा जागीच मृत्यू झाला.
 


solapur pune pravasi sangatana