अपघात की घातपात ?

31/07/2012 13:00
 
- ‘तामिळनाडू एक्स्प्रेस’ दुर्घटनेची होणार सखोल चौकशी
नेल्लोर। दि. ३0 (वृत्तसंस्था)
तामिळनाडू एक्स्प्रेसच्या डब्याला आग लागण्यापूर्वी त्यात स्फोटासारखा आवाज आल्याचे प्रत्यक्षदश्रींचे म्हणणे आहे. त्यामुळे हा घातपात असावा, अशी शक्यता वर्तवली जात आहे. या अपघाताची सखोल चौकशी करण्यात येईल, असे आश्‍वासन रेल्वेमंत्री मुकुल रॉय यांनी दिले.
या रेल्वे डब्यात आग लागण्यापूर्वी त्यात स्फोट झाल्याचा आवाज ऐकू आला, असे जवळच्याच एका लेव्हल क्रॉसिंगवरील गेटमनचे म्हणणे आहे. विभागीय रेल्वे व्यवस्थापकांनीही तशाच बातम्या कानावर आल्याचे कळविले आहे. परंतु सखोल चौकशी झाल्याखेरीज नक्की काहीच सांगता येणार नाही. अपघाताच्या कारणांची चौकशी करण्यासाठी समिती नेमण्यात आली असून, ती १५ दिवसांत अहवाल देईल. शॉर्टसर्किट किंवा डब्यात कदाचित कोणी तरी ज्वालाग्राही पदार्थ आणले असण्याची शक्यता या सर्वांचा समिती विचार करेल, असे त्यांनी सांगितले.
रेल्वे प्रवासाची सुरक्षा व सुरक्षितता वाढविण्याचा विषय पंतप्रधानांकडे उपस्थित केला गेला आहे, असे सांगून रेल्वेमंत्री म्हणाले की, प्रगत तंत्रज्ञानासाठी निधी
लागेल. त्यासाठी सविस्तर अहवाल तयार करून आठवडाभरात तो पंतप्रधान व नियोजन आयोगास सादर केला जाईल. अशा प्रकारची दुर्दैवी घटना पुन्हा घडू नये यासाठी शक्य ते सर्व केले जाईल, असे आश्‍वासनही त्यांनी दिले.

रेल्वे की मृत्यूचा सापळा?
४ जून २00२ - एका रेल्वे क्रॉसिंगवर कासगंज एक्स्प्रेसची बसला भीषण धडक, ३४ ठार.
१0 सप्टेंबर २00२ - बिहार - एका पुलावरून कोलकाता-नवी दिल्ली जधानी एक्स्प्रेस घसरली, १२0 ठार.
३ जाने. २00३ - दक्षिण-मध्य महाराष्ट्रात एका एक्स्प्रेसचे तीन डबे रुळावरून घसरले, १८ ठार.
१५ मे २00३ - पंजाब - स्टोव्हच्या स्फोटामुळे जलद पॅसेंजर रेल्वेगाडीला आग; ४0 ठार, ५0 जखमी.
२२ जून २00३ - महाराष्ट्र - सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोकण रेल्वेच्या कारवार - मुंबई हॉलाडे स्पेशलचे इंजिन व तीन डबे रुळावरून घसरले; ५३ ठार,२५ जखमी.
२ जुलै २00३ - आंध्र प्रदेश - रेल्वेगाडीचे इंजिन व दोन डबे पुलाखालून जाणार्‍या मोटारगाड्यांवर कोसळले; २२ रेल्वे प्रवासी आणि वाहनचालक ठार.
१६ जून २00४ - महाराष्ट्र - मुंबईकडे जाणारी कोकण रेल्वेची मत्स्यगंधा एक्स्प्रेस रायगड जिल्ह्यात पूल ओलांडताना रुळावरून घसरली; २0 ठार, ६0 जखमी.
२८ मे २0१0 - रुळाची नासधूस केल्यामुळे ज्ञानेश्‍वरी एक्स्प्रेसच्या १३ रुळांवरून घसरलेल्या डब्यांना विरुद्ध दिशेने येणार्‍या मालगाडीची धडक;१४८ ठार.
१९ जुलै २0१0 - पश्‍चिम बंगाल - बिरभुम जिल्ह्यात साइंथिया रेल्व ेस्थानकावर सियालदाहकडे जाणार्‍या भरधाव उत्तरबंगा एक्स्प्रेसची वनांचल एक्स्प्रेसला धडक, ६0 ठार.
२२ मे २0११ - बिहार - मधुबनी जिल्ह्यात मानवरहित रेल्वे क्रॉसिंगवर रेल्वे गाडीने वाहन उडविले, १६ जागीच ठार.
७ जुलै २0११ - एका मानवरहित क्रॉसिंगवर ८0 प्रवाशांना घेऊन जाणार्‍या बसला रेल्वे गाडीने धडक दिल्यामुळे ३१ बस प्रवासी ठार व अन्य १७ जखमी.
२२ मे २0१२ - आंध्र प्रदेश - अनंतपूर जिल्ह्यात बंगळुरूकडे जाणारी हंपी एक्स्प्रेस मालगाडीला धडकली, २५ ठार.

 


solapur pune pravasi sangatana