अलाहबाद दुर्घटनेतील मृतांची संख्या ३६वर

11/02/2013 13:06
अलाहबाद, दि.११ - कुंभमेळ्याहून परतणा-या भाविकांची अलाहबाद स्टेशनवर गर्दी उसळून झालेल्या चेंगराचेंगरीत ठार झालेल्या संख्या ३६ वर पोचल्याचे वृत्त आहे. रविवारी मौनी अमावस्येनिमित्त भाविकांनी गंगास्नान केले. त्यानंतर संध्याकाळी अलाहबाद स्थानकावर आलेल्या भाविकांमुळे पाच व सहा क्रमांकाच्या प्लॅटपॉर्मवर पाय ठेवण्यासही जागा उरली नव्हती. संध्याकाळी सातच्या सुमारास स्टेशनवरील पुलाचा कठडा तुटला आणि काही भाविक एकमेकांवर पडले. त्यावेळी एकच गोंधळ उडाल्याने चेंगराचेंगरी झाल्याचे रेल्वे अधिका-यांनी सांगितले.
दरम्यान या दुर्घटनेचे नेमके कारण शोधण्यासाठी सीसीटीव्ही फुटेज तपासणार असल्याचे रेल्वेमंत्री पवनकुमार बन्सल यांनी स्पष्ट केले. या कुंभमेळ्यासाठी पुरेशा गाड्या सोडलेल्या असतानाही स्थानकात चेंगराचेंगरी कशी झाली हे जाणून घेण्यासाठी सीसीटीव्ही फूटेज तपासणार असल्याचे ते म्हणाले. रेल्वेच्या वरिष्ठ अधिका-यांसोबत बन्सल आज दुर्घटना स्थळाला भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेणार आहेत.

solapur pune pravasi sangatana