अहमदाबाद-यशवंतपूर रेल्वेच्या कालावधीत वाढ

18/03/2011 12:04

पुणे : अहमदाबाद-यशवंतपूर आणि पोरबंदर-सिकंदराबाद या साप्ताहिक रेल्वेचा कालावधी जूनअखेरपर्यंत वाढविण्यात आला आहे. अहमदाबाद-यशवंतपूर रेल्वे २ एप्रिल ते २७ जूनदरम्यान दोन्ही बाजूने १३-१३ वेळा धावणार आहे. अहमदाबादहून (०९४०५) ही रेल्वे प्रत्येक शनिवारी सायंकाळी १९.३०ला निघेल. पुण्याला प्रत्येक रविवारी सकाळी ७.४८ ला येईल आणि यशवंतपूरला सोमवारी पहाटे ४ वाजता पोहोचेल. पोरबंदर-सिकंदराबाद ही विशेष साप्ताहिक रेल्वे पोरबंदरहून (०९२२१) प्रत्येक सोमवारी २३.५० वाजता सिकंदराबादकडे रवाना होईल. मंगळवारी २२.२५ वाजता पुण्यात येईल आणि दुसऱ्या दिवशी बुधवारी सकाळी १०.३० ला सिकंदराबादला पोहोचेल. सिकंदराबादहून प्रत्येक बुधवारी दुपारी १४.५० वाजता निघून गुरुवारी पहाटे २ वाजता पुण्यात येईल आणि शुक्रवारी पहाटे १.३० ला पोरबंदरला पोहोचेल.


solapur pune pravasi sangatana