आज रेल्वे बजेट : भाडेवाढ नाही; मात्र सुरक्षेचा अधिभार प्रवाशांवरच

14/03/2012 12:22
नवी दिल्ली। दि. १३ (वृत्तसंस्था)
रेल्वे अर्थसंकल्पात दरवाढ होण्याची शक्यता नाही. प्रवासी दरवाढ आणि मालभाड्यामध्ये वाढीची शक्यता नसली, तरी उच्च श्रेणीतील प्रवासाकरिता सुरक्षाकर लावण्यात येईल, असे संकेत उद्या सादर होणार्‍या रेल्वे बजेटच्या पार्श्‍वभूमीवर मिळत आहेत.
रेल्वेने बजेटपूर्वीच ६ मार्चपासून माल भाडेवाढ केल्याने नव्याने माल भाडेवाढीचा बोजाही पडणार नसल्याचाही अंदाज आहे.
ममता बॅनर्जी यांनी आपल्या कार्यकाळात द्वितीय श्रेणीच्या भाड्यात वाढ केलेली नव्हती. त्यामुळे त्यांचे वारसदार बनलेल्या द्विवेदी यांनाही तोच मार्ग अवलंबावा लागण्याची शक्यता आहे. मात्र छुप्या दरवाढीचा नामी उपाय ते वापरू शकतात.
काकोडकर समितीने अलीकडेच रेल्वे भाडेवाढ न केल्याने रेल्वेच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याचे ताशेरे ओढले होते. रेल्वेची सिग्नल, टेलिकम्युनिकेशन, रूळ आदी सुरक्षा उपायांसाठी ५ हजार कोटी रुपयांची गरज लागणार आहे. त्यामुळे तिकिटाचे दर कायम राहिले, तरी सुरक्षा अधिभार प्रवाशांना सहन करावा लागण्याची शक्यता आहे.

solapur pune pravasi sangatana