आजोबांना रेल्वे प्रवासात 40 टक्के सूट - एक जूनपासून अंमलबजावणी

25/05/2011 14:17

मुंबई। दि. 24
ज्येष्ठ पुरूष नागरिकांना एक जूनपासून लांब पल्ल्यांच्या प्रवास तिकीटावर चाळीस टक्के सुट तसेच महिला ज्येष्ठ नागरिकत्वाची वयोमर्यादा 60 वर्षाऐवजी 58 वर्षे करण्याची घोषणा रेल्वेने प्रशासनाने आज केली़ हा निर्णय 1 जूनपासून लागू होणार आहे.

25 फेब्रुवारी रोजी झालेल्या रेल्वे अर्थसंकल्पात ही घोषणा करण्यात आली होती. यापूर्वी पुरूष ज्येष्ठ नागरीकांना लांब अंतराच्या प्रवासासाठी तिकीटावर 30 टक्के सुट देण्यात येत होती. मेल एक्स्प्रेस गाडय़ांबरोबरच राजधानी, जनशताब्दी आणि शताब्दी गाडय़ांमध्येही तिकीटावरची सवलत मिळणार आह़े मात्र, तिकीटांवरील सवलत ज्येष्ठ महिला नागरिकांना लागू करण्यात आलेली नाही़ त्यामुळे ज्येष्ठ महिला नागरिकांना लांब अंतराच्या तिकीटावर सध्याची 50 टक्के सवलतच लागू राहील़

तिकीट आरक्षणासाठी स्वतंत्र तिकीट खिडकी, सामान उचलण्यासाठी व्हीलचेअर तसेच ज्येष्ठ नागरिकांना अपंगासाठी असणार्‍या रेल्वे डब्यात चढण्याची सवलत देण्यात आली आह़े़ येत्या जूनपासून लागू होणार्‍या तिकीटावरील सवलतीमूळे ज्येष्ठ पुरूष नागरीकांचा प्रवास अधिक सुखकर होण्याची चिन्हे आहेत़


solapur pune pravasi sangatana