आरक्षण केंद्रात वाढती गर्दीमुळे अतिरिक्त खिडकी

22/03/2011 12:26

सोलापूर - ई तिकीट सुविधा बंद असल्याच्या कारणावरून सोलापूर आरक्षण केंद्रात तिकीट प्राप्त करण्यासाठी जास्त कालावधी लागत आहे, ही गर्दी लक्षात घेता आरक्षण केंद्रात एक जादा खिडकी कार्यान्वित करण्यात आली असल्याची माहिती वरीष्ठ वाणिज्य व्यवस्थापक सुशील गायकवाड यांनी दिली.

आयआरसीटीसी संकेतस्थळावरून ई तिकीट सुविधा तात्पुरत्या स्वरुपात बंद ठेवली गेली आहे. त्यामुळे आरक्षण केंद्रातील गर्दी सध्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. गुरुवारी सायंकाळी सहाच्या दरम्यान आरक्षण केंद्रातील प्रवाशांच्या प्रतिक्रिया विचारल्या असत्या समीर बडेघर यांनी सांगितले की, दुपारी पावणेदोन वाजता मी नंबर घेतला. तो 1584 इतका होता. आता सहा वाजले असता 1490च्या आसपास नंबर सुरू आहे. अजून तासभर तरी नंबर येऊ शकणार नाही. याचा अर्थ पाच तास मला प्रतीक्षा करावी लागत आहे.

मिरजचा युवक अमीत भुमनाळे म्हणाला, ""तिकीट काढण्यासाठी खूप प्रतीक्षा करावी लागत आहे. हा कालावधी कमी करण्यासाठी प्रयत्न हवेत.''
सोलापुरातील विवेक दोशी म्हणाला, ""मी दुपारी दोन वाजता नंबर घेतला होता. आता साधारणत: सात वाजता तो येण्याची अपेक्षा आहे.''
एकूणच सध्या गर्दीचा कालावधी नसला तरी आरक्षण केंद्रातील वाढती गर्दी पाहता इंटरनेटवरून तिकीटे काढता येण्याची सुविधा बंद राहिली तर प्रवाशांना अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे स्पष्ट दिसून येते.
.
आरक्षण केंद्र परिपूर्ण
सोलापूरच्या आरक्षण केंद्रात पुरेशा सुविधा प्रदान करण्यात आल्या आहेत. आरक्षणासाठी सहा खिडक्‍या कार्यान्वित करण्यात आल्या आहेत. रेल्वे टाईमटेबल, रेल्वे नंबर, रेल्वेचे नाव, टाईमटेबल असे मराठी व इंग्रजीतून असलेले फलक, पीएनआर, आरक्षण जागा याची माहिती देणारे संगणक यासह नवीन स्टीलच्या चकाचक खुर्च्या, बाकडे ठेवण्यात आले आहेत. स्वच्छता ठेवली गेली आहे. कागद, कचरा टाकण्यासाठी वेस्टबॉक्‍सही ठेवण्यात आला आहे. पिण्याच्या पाण्याची सोयही आहे. विभागीय वाणिज्य व्यवस्थापक सुशील गायकवाड यांनी सांगितले की, आरक्षण केंद्रात जास्तीत जास्त सुविधा पुरविण्यासाठी रेल्वे प्रशासन कटिबद्ध
आहे.


solapur pune pravasi sangatana