इंटरसिटीवर ढवळसजवळ दरोडा ल्ल चार महिला जखमी; नऊ प्रवाशांचे दागिने लुटले !

24/09/2012 10:42
कुडरूवाडी। दि. 23 (वार्ताहर)
पुण्याहून सोलापूरकडे निघालेल्या इंटरसिटी हुतात्मा एक्स्प्रेसवर ढवळस (ता. माढा) येथे अज्ञात 10 ते 15 चोरटय़ांनी दोन बोगीवर धारदार शस्त्राने हल्ला करून नऊ प्रवाशांचे दागिने लुटून नेले. दरोडेखोरांनी केलेल्या हल्ल्यात तीन महिला जखमी झाल्या. ही घटना रात्री 8.35 ते 8.50 च्या दरम्यान घडली. सलग दुस:या दिवशी इंटरसिटीवर दरोडा पडल्याने प्रवाशांत घबराट निर्माण झाली आहे. घटनेनंतर पोलीस न आल्याने प्रवाशात उद्रेक झाला.
कुडरूवाडीत 42 मिनिटे गोंधळ
लोहमार्ग पोलीस, रेल्वे सुरक्षा दल, रेल्वे अधिकारी यांनी प्रवाशांना समाजावून सांगून आरोपींना त्वरित अटक केली जाईल, असे आश्वासन दिले. त्यानंतर प्रवाशांनी गाडी पुढे नेण्यास परवानगी दिली. हा गोंधळ कुडरूवाडी रेल्वे स्थानकावर सुमारे 42 मिनिटे चालू होता. जखमी महिलांवर रेल्वे हॉस्पिटलचे डॉ. आशिष शहा, कोमल भीमराव, तिमप्पा यांनी उपचार केले. रात्री 9.43 वाजता इंटिरसिटी सोलापूरकडे रवाना झाली. या प्रवासाच्या दरम्यान लोहमार्ग पोलिसांनी प्रवाशांची फिर्याद दाखल करून घेतली

solapur pune pravasi sangatana