तिघांचा चिरडून तर दोघांचा पुलावरुन पडल्याने मृत्यू

10/06/2010 10:39

 तिघांचा चिरडून तर दोघांचा पुलावरुन पडल्याने मृत्यू

अमळनेर, दि.९ : रुळावर खेळताना अचानक रेल्वे आल्याने मृत्यू डोळ्यासमोर बघून भेदरलेल्या मुलांपैकी तिघे चिरडले गेले. तर जीव वाचविण्याच्या प्रयत्नात दोघांनी पुलावरुन उड्या घेतल्याने दगडावर आदळून जागीच अंत झाल्याची घटना शुक्रयारी घडली. सकाळी ११ वाजता पश्चिम रेल्वेच्या भुसावळ-उधना मार्गावरील अमळनेर रेल्वे स्थानकापासून एक किलोमीटर अंतरावरील बोरीनदीच्या पुलावर घडली.अल्ताफ सलिम शेख, अकिब सिराजउद्दीन मुजावर, सलिमउद्दीन सिराजउद्दीन मुजावर, रइसोद्दिन गयासोद्दिन मुजावर, एजाजोद्दिन गयासउद्दिन मुजावर (रा.गांधलीपुरा, अमळनेर) अशी मृतांची नावे आहेत. मृतांमध्ये एका माजी नगरसेवकाच्या मुलाचा तर प्रत्येकी दोन सख्खे भावंड आहेत. एजाजोद्दिन हा सहावीत तर रइसोद्दिन सातवीमध्ये गं.स.हायस्कुलमध्ये तर अल्ताफशेख (८वी) हा नॅशनल उर्दू शाळेत शिकत होता. उर्वरीत दोघे शाळेत जात नव्हते.चालकाने गाडी थांबविली
गाडीखाली तीन बालकाचा मृत्यू झाल्याने पॅसेंजरच्या चालकाने पुलापासून थोडया अंतरावर गाडी थांबविली. चालकाने मृतदेह बघुन त्याची कल्पना स्टेशनमास्तरला दिली. घटनास्थळी २० मिनीटे गाडी थांबुन होती, असे अमळनेरच्या रेल्वे स्टेशन प्रबंधकांनी सांगितले

 


solapur pune pravasi sangatana