ऐन गर्दीच्या वेळी मध्य रेल्वेचे तीनतेरा

07/05/2011 11:30

मुंबई, ६ मे
माटुंगा-सायन स्थानकांदरम्यान ओव्हरहेड वायर तसेच लोकलचा पेंटोग्राफ तुटल्याने आज संध्याकाळी ऐन गर्दीच्या वेळी मध्य रेल्वेच्या वाहुतकीचा खेळखंडोबा झाला. विस्कळीत उपनगरी वाहतुकीमुळे कामधंद्यावरून घरी निघालेल्या प्रवाशांचे त्यामुळे बेसुमार हाल झाले.
डाऊन धीम्या मार्गाची ओव्हरहेड वायर आज संध्याकाळी सव्वाचार वाजण्याच्या सुमारास माटुंगासा यन स्थानकांदरम्यान तुटली. सीएसटीहून कुल्र्याला जात असलेल्या लोकलचा पेंटोग्राफ अडकल्याने ओव्हरहेड वायर तुटली तसेच लोकलचा पेंटोग्राफसुद्धा तुटला. परिणामी डाऊन धीम्या मार्गावरील वाहतूक जागीच ठप्प झाली.
मध्य रेल्वेच्या पथकाने तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. तोवर डाऊन धीम्या मार्गावरील वाहतूक माटुंगा ते विद्याविहारदरम्यान डाऊन जलद मार्गावर वळविण्यात आली होती. रेल्वेमार्गावर लोकलची लांबच लांब रांग लागली होती. जवळपास १६ लोकल रद्द करण्यात आल्या.


solapur pune pravasi sangatana