कार्तिकीसाठी 1800 बस सोलापूर विभागामार्फत 150 गाडय़ांची सोय

05/11/2011 10:41

दि. 4 (पंढरपूर)
कार्तिकी यात्रेसाठी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या 1800 बसगाडय़ा राज्यभर धावणार असून, पुणे-सातारा रस्त्यावर चंद्रभागा बसस्थानक उभारण्यात आले आहे. यात 18 पत्राशेड उभारले आहेत.
सोलापूर विभागामार्फत 150 गाडय़ांची व्यवस्था करण्यात आली आहे. सोलापूर 18, बार्शी 30, करमाळा 15, पंढरपूर 20, अक्कलकोट 12, अकलूज 25, सांगोला 10, कुडरूवाडी 8, मंगळवेढा 12 अशा प्रकारे सोलापूर विभागामार्फत बसगाडय़ा सोडण्यात आल्या आहेत. पुणे प्रदेशामार्फत गेल्या वर्षी 535 गाडय़ा सोडण्यात आल्या होत्या. यंदा 600 गाडय़ांची उपलब्धता आहे. पुणे प्रदेश विभागामार्फत सांगली, सोलापूर, सातारा, पुणे, कोल्हापूर आदी भागामध्ये गाडय़ा सोडण्यात आल्या आहेत. उर्वरीत गाडय़ा महाराष्ट्रभर धावणार आहेत.
चंद्रभागा बसस्थानकातून पुणे, सातारा, र}ागिरी, सिंधूदुर्ग, रायगड, ठाणे, बीड, लातूर, नगर, कर्नाटक या विभागाच्या गाडय़ा सोडण्यात येणार आहेत. नवीन बसस्थानकातून सोलापूर विभागाच्या जादा बसगाडय़ा सोडण्यात येत आहेत व जुन्या बसस्थानकातून कोल्हापूर, सांगली विभागाच्या जादा गाडय़ा सोडण्यात येणार आहेत.
यात्रेसाठी उभारण्यात आलेल्या चंद्रभागा बसस्थानकात प्रत्येक पत्राशेडवर तात्पुरत्या स्वरूपाची पिण्याच्या पाण्याची सोय करण्यात आली आहे. त्याठिकाणी माहिती केंद्र, उपहारगृह, झुणका भाकर केंद्र, प्रथमोपचार केंद्र,
वीज, स्वच्छतागृह आदी सोयीसुविधा नगरपालिका व एस.टी. महामंडळाने दिलेल्या आहेत.


solapur pune pravasi sangatana