काश्‍मीरमध्ये रेल्वेची सुरक्षा वाढवणार

19/05/2011 16:49

श्रीनगर - काश्‍मीरमधील लोहमार्गांची सुरक्षा वाढविण्यात आली असल्याची माहिती सूत्रांनी आज (गुरुवार) दिली. काश्‍मीरमध्ये गेल्या वर्षी झालेल्या आंदोलनामध्ये रेल्वेचे प्रचंड नुकसान झाल्याच्या पार्श्‍वभूमीवर ही सुरक्षा वाढविण्यात आली आहे.

"" प्रत्येक रेल्वे स्थानकावर पोलिसांची उपस्थिती आहे. प्रत्येक स्थानकावर एक पोलिस ठाणे असेल आणि प्रत्येक लोहमार्गासाठी गस्तदेखील घालण्यात येईल,'' असे जम्मू काश्‍मीरचे पोलिस महासंचालक कुलदीप खोडा यांनी सांगितले आहे.

गेल्या वर्षातील जुलै महिन्यात झालेल्या आंदोलनामध्ये उत्तर काश्‍मीरमधील सोपोरे या गावामधील रेल्वे स्थानक आंदोलकांनी जाळले होते, तसेच मध्य काश्‍मीरमधील रेल्वे यार्डाचेही नुकसान करण्यात आले होते.

लोहमार्गांच्या सुरक्षेची ही मोहिम राज्य पोलिस आणि केंद्रीय राखीव पोलिस दल मिळून राबवणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.


solapur pune pravasi sangatana