कुडरूवाडीत पूर्ववैमनस्यातून मारहाण; दोघे गंभीर

26/12/2011 17:41
कुर्डूवाडी। दि. 25 (वार्ताहर)
झालेला तंटा मिटवू म्हणून बोलावून मागील भांडणाचा राग मनात धरून मारहाण केल्याची घटना लेंगरे वसाहत कुडरूवाडी येथे शुक्रवारी रात्री 10 वाजता घडली. यात फिर्यादी अमोल राजेंद्र फडतरे व अतुल राजेंद्र फडतरे हे दोघे गंभीर जखमी झाले. या प्रकरणी परस्परविरोधी फिर्याद दाखल झाली आहे.
फिर्यादी अमोल राजेंद्र फडतरे (रा.रेल्वे कॉलनी कुडरूवाडी) व त्याचा भाऊ अतुल राजेंद्र फडतरे यांना भैय्या लेंगरे यांनी लेंगरे वस्तीवर बोलावून पूर्वी झालेला तंटा मिटवू म्हणून घरी बोलावून घेतले. यावेळी राजकारणात पुढे पुढे करू नका असे सांगत पूर्ववैमनस्यातून अरविंद भिवा पवार, भैय्या विश्वनाथ लेंगरे, अतुल बागल व अन्य 5 जणांनी तलवारीने लोखंडी पारेने व काठीने मारहाण केली. अमोल राजेंद्र फडतरे यांच्या फिर्यादीवरून कुडरूवाडी पोलिसात भादवि 307 अन्वये 8 जणांवर गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक हारूण शेख हे करीत आहेत.
दुस:या फिर्यादीत दादागिरी करतो काय म्हणून लाथाबुक्क्या, लोखंडी रॉडने तिघांनी मारहाण केल्याचे विश्वनाथ लेंगरे (वय 58, कुडरूवाडी) यांनी फिर्यादीत म्हटले आहे. अतुल फडतरे, अमोल फडतरे, अभिजित बागल, सागर गोफणे, खंडू फंड व इतर अनोळखी दोघांवर कुडरूवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास हवालदार कुलकर्णी करीत आहेत.

 


solapur pune pravasi sangatana