कुर्डुवाडी रेल्वे कारखान्याचे होणार पुनर्निर्माण

23/04/2010 14:02
रेल्वे मंत्रालयाने कुर्डुवाडी येथील नॅरोगेज रेल्वे कारखान्याचे ब्रॉडगेज कारखान्यात रूपांतर करण्यासाठी तसेच वॅगन पुननिर्र्माणासाठी ३० कोटी २५ लाख रुपये मंजूर केले असल्याची माहिती केंदीय रेल्वे समितीचे सदस्य खासदार रणजीतसिंह मोहिते पाटील यांनी दिली.

१९३० मध्ये पंढरपूर-लातूर ही नॅरोगेज रेल्वे बाशीर् लाइट कंपनी म्हणून चालवली जात होती. कुर्डुवाडी येथील रेल्वे कारखान्यात नॅरोगेजचे डबे व इंजिन तयार केले जात होते. तसेच त्याची दुरुस्तीही केली जात होती. १९८२ मध्ये डिझेल इंजिन आल्याने येथील पुननिर्र्माण आणि इंजिन दुरुस्तीचे काम बंद पडले. २००० मध्ये ब्रॉडगेज डबे दुरुस्तीचे काम येथे सुरू करावे असा प्रस्ताव रेल्वे मंत्रालयाकडे पाठवण्यात आला. त्यासाठी १०० कोटी रुपयांची मागणी करण्यात आली होती.

पंढरपूर-लातूर हा रेल्वेमार्ग ब्रॉडगेज झाल्याने कुर्डुवाडी येथील नॅरोगेज डब्याचा कारखाना बंद पडला. हा कारखाना बंद झाल्याने कारखान्यात काम करणाऱ्या असंख्य कामगारांवर बेकारीची कुऱ्हाड कोसळली. या कारखान्याचे रुपांतर ब्रॉडगेजमध्ये व्हावे व येथील कामगारांना रोजगार मिळावा अशी मागणी या भागातील कामगारांनी खासदार रणजीतसिंह यांच्याकडे केली होती. त्यांनी यासंदर्भातील प्रश्न राज्यसभेत उपस्थित केला होता. ब्रॉडगेज डबे दुरुस्तीचा कारखाना हा परळ येथे असल्याने केंदीय मंत्रालयाने कुर्डुवाडी येथे वॅगन पुनर्निर्माण करण्याचा कारखान्याला मंजुरी दिली.

solapur pune pravasi sangatana