कुर्डुवाडी रेल्वे डबा निमिर्ती प्रकल्प रखडला

09/02/2009 13:26

रेल्वे मंत्रालयाकडून घोषित झालेला 'कुर्डुवाडी' येथील 'रेल्वे डबा' निमिर्ती प्रकल्प हा केवळ १०० कोटी रुपयांच्या निधीअभावी आणि जिल्ह्यातील नेतेमंडळींच्या उदासिनतेमुळे रखडला.

ब्रिटीशांच्या राजवटीत १८९७ मध्ये 'बाशी लाइट रेल्वे' या नावाने नॅरोगेज रेल्वे 'कुर्डुवाडी-बाशीर्' दरम्यान सुरू करण्यात आली. १९११ मध्ये ही रेल्वे 'कुर्डुवाडी-लातूर आणि कुर्डुवाडी-मिरज अशी करण्यात आली. लातूर-कुर्डुवाडी-मिरज असा ३२४ किमी अंतराचा रेल्वेमार्ग त्यावेळी सुरू करण्यात आला. यानंतर १९९३० मध्ये बाशीर् लाईट रेल्वे नॅरोगेज-वाफेचे इंजिन, प्रवासी डब्बे यांच्या दुरुस्तीसाठी आणि देखभालीसाठी 'कुर्डुवाडी' येथे कारखाना स्वरुपात कार्यशाळेची निमिर्ती करण्यात आली.

१९७२ मध्ये या कारखान्यात ब्रॉडगेज रेल्वेमार्गावरील रेल्वेसाठी डब्बे तयार करण्याचे कामही सुरू करण्यात आले. या ठिकाणी अत्यंत कुशलतेने काम होत असताना १९८६ मध्ये येथील काम बंद पडले. कुर्डुवाडीच्या रेल्वे कारखान्याला १९८६ पासून अवकळा आली होती. तोपर्यंत या रेल्वेच्या कारखान्यात २५०० कामगार होते. तसेच येथे शिकाऊ कामगारांना प्रशिक्षण देण्याचीही सुविधा होती. परंतु ही सुविधाही आता बंद करण्यात आली आहे.

सध्या या कारखान्यात कामाची उपलब्धता दिवसेंदिवस कमी होऊ लागल्याने, कोणत्याही क्षणी हा कारखाना बंद होईल, अशी स्थिती निर्माण झाली होती. परंतु यावेळी कारखाना बचाव समितीने पुकारलेल्या आंदोेलनामुळे आणि येथील लोकांच्या जागरुकतेमुळे हा कारखाना संपुष्टात येण्याची प्रक्रिया मंदावली आहे.

सध्या या रेल्वेच्या कारखान्यात रेल्वे कामगार आणि अधिकारी मिळून ३१६ जण कार्यरत आहेत. परंतु या कारखान्याची अवस्था सध्या तरी मरणावस्थेत असल्यासारखीच आहे.


solapur pune pravasi sangatana