कुर्डुवाडी- लोहमार्ग पोलिसांमुळे रेल्वेवरील दरोडा टळला

16/02/2012 11:22
कुर्डुवाडी । दि. 9 (वार्ताहर)
कुर्डुवाडी- लोहमार्ग पोलिसांच्या कर्तव्यदक्षतेमुळे रेल्वेवरील दरोडा टळला. बुधवारी रात्री पावणेनऊच्या दरम्यान भाळवणी स्टेशन आऊटरच्या डाऊन वायरची केबल कोणीतरी तोडली, हा रिपोर्ट स्टेशन मास्तराकडून कळताच रेल्वे पोलीस कर्मचारी राजू काळे यांनी लोहमार्ग पोलीसचे पो़नि़ रमेश भिंगारदेवे यांना कळताच त्यांनी घटनास्थळी भेट दिल्याने अनर्थ टळला.
तातडीने पोलीस निरीक्षक रमेश भिंगारदेवे, पीएसआय सुभाष पाटोळे, कर्मचारी संजय सरोदे, प्रवीण सोनवणे, अजय राठोड, सुधाकर जगताप, खताळ हे घटनास्थळी हजर झाले. रेल्वे कर्मचा:यांनी तातडीने ती वायर जोडली व सिगAल सुरू केला. चोरटय़ांसाठी रात्रीची वेळ व भाळवणी, केम, पोफळज, पारेवाडी, जिंती ही स्टेशने दरोडे टाकण्यासाठी सोयीस्कर आहेत. गाडी आऊटरला थांबवायची व डब्यात चढून प्रवाशांना लुटायचे, असे प्रकार येथे नेहमीच घडतात.
रेल्वे प्रशासनाने यासाठी सिगAलच्या सर्व केबल्स जमिनीतून कराव्यात. सिगAलच्या जागी रेल सुरक्षा बल अथवा पोलिसांची नेमणूक करावी, अशी मागणी प्रवाशांतून होत आहे. चोरटय़ांना माहीत आहे की प्रवासी नसते बालंट नको म्हणून पोलिसात तक्रार देत नाहीत. तर पोलीस तक्रार येईर्पयत कारवाई करीत नाहीत म्हणून हे प्रकार दिवसेंदिवस वाढतच चालले आहेत. प्रशासनाने लक्ष द्यावे अशी मागणी होत आहे.

solapur pune pravasi sangatana