कुर्डुवाडी पॅसेंजर उद्यापासून

30/07/2012 13:18

मिरज - रेल्वे अंदाजपत्रकात घोषित मिरज-कुर्डुवाडी पॅसेंजर मंगळवारपासून (ता. 31) नियमित सुरू होत आहे. पहाटे 6.05 वाजता ती मिरजेतून निघेल व कुर्डुवाडीत 10.35 ला पोचेल. तेथून 11.50 ला सुटेल; तर मिरजेत 4.25 ला येईल. मिरज-पंढरपूर मार्गावर नियमित धावणारी ही चौथी गाडी असेल. पंढरपूरच्या आषाढी यात्रेसाठी ही गाडी 27 जून ते 4 जुलैदरम्यान सोडली होती. यात्रा संपल्यानंतर ती स्थगित करण्यात आली. अंदाजपत्रकातील घोषणेनुसार ती आता मंगळवारपासून नियमित धावेल.


solapur pune pravasi sangatana