कुर्ला रेल्वेच्या नव्या इमारतीचे आज उद्‌घाटन

01/12/2012 13:09
मुंबई- मध्य रेल्वेच्या लोकमान्य टिळक टर्मिनसची (कुर्ला) नवीन अत्याधुनिक इमारत प्रवाशांच्या सेवेसाठी उद्या (ता. 1) खुली होणार आहे. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते उद्या सायंकाळी 6 वाजता या इमारतीचे उद्‌घाटन होईल.

मध्य रेल्वेने 22 कोटी रुपये खर्च करून कुर्ला टर्मिनसची नवीन इमारत बांधली आहे. लांब पल्ल्याच्या प्रवाशांच्या सोयीसाठी या इमारतीत आठ खाटांचे साधे आणि 32 खाटांच्या वातानुकूलित विश्रांतीगृहाची व्यवस्था करण्यात आली आहे. नूतनीकृत टर्मिनसमध्ये 20 तिकीट खिडक्‍या आणि तब्बल 200 मीटर लांबीचे प्रतीक्षालय तयार करण्यात आले आहे. प्रवाशांसाठी पिण्याच्या पाण्याची आणि स्वच्छतागृहांची पुरेशी व्यवस्था करण्यात आली आहे. मुंबईतील सर्वाधिक गर्दीचे समजल्या जाणाऱ्या कुर्ला टर्मिनस येथे येणाऱ्या प्रवाशांची नव्या इमारतीमुळे सोय होणार आहे.

solapur pune pravasi sangatana