कोकण रेल्वेच्या आठ गाड्यांची वेळ बदलली

06/06/2013 14:30
मुंबई : पावसाळ्यात कोकण रेल्वे प्रवाशांचा प्रवास सुखकर व्हावा आणि त्याचबरोबर गाड्या वेळेवर धावतील याची काळजी कोकण रेल्वेने घेतली आहे. कोकण रेल्वेने पावसाळी वेळापत्रक जाहीर केले असून, कोकणात धावणार्‍या आठ गाड्यांच्या वेळेत बदल केल्याचे कोकण रेल्वेच्या प्रसिद्धिपत्रकात म्हटले आहे.
१0 जून ते ३१ ऑक्टोबरपर्यंत कोकण रेल्वेचे नवीन वेळापत्रक लागू राहणार आहे. कोकण रेल्वेच्या मडगाव-सीएसटी मांडवी ट्रेन, सावंतवाडी-दादर राज्यराणी एक्स्प्रेस, एर्नाकुलम-निजामुद्दीम मंगला एक्स्प्रेस, जनशताब्दी एक्स्प्रेस, मंगलोर-एलटीटी मत्स्यगंधा एक्स्प्रेस, मडगाव-सीएसटी कोकणकन्या एक्स्प्रेस एक्स्प्रेस, मडगाव-हापा एक्स्प्रेस, मडगाव-एर्नाकुलम एक्स्प्रेस या गाड्यांच्या वेळा बदलण्यात आल्या आहेत.
बदललेल्या वेळा..
- १0१0४ मडगाव-सीएसटी
मांडवी एक्स्प्रेस 0८.३0
- ११00४ सावंतवाडी-दादर राज्यराणी एक्स्प्रेस १७.३0
- १२६१७ एर्नाकुलम-निजामुद्दीम मंगला एक्स्प्रेस १0.४५
- १२0५२ जनशताब्दी १२.१0
- १२६२0 मंगलोर-एलटीटी मत्स्यगंधा एक्स्प्रेस १२.५0
- १0११२ मडगाव-सीएसटी कोकणकन्या एक्स्प्रेस १६.४५
- २२९0७ मडगाव-हापा 0७.१५
- १0२१५ मडगाव-एर्नाकुलम एक्स्प्रेस २१.00

(प्रतिनिधी)

solapur pune pravasi sangatana