कोल्हापूर-धनबाद रेल्वे शुक्रवारी धावण्याची शक्‍यता

07/03/2011 15:03

कोल्हापूर - येथील रेल्वे स्थानकावरून कोल्हापूर ते धनबाद ही रेल्वे शुक्रवारी (ता. 25) मध्यरात्री दीडला सुटणार असल्याची माहिती विश्‍वसनीय सूत्रांकडून समजते. ही रेल्वे कधी सुटणार, याबाबत प्रवाशांतून सातत्याने विचारणा होत होती. मिरज, पुणे, दौंड, मनमाड, नांदेड, नागपूर, इटारसी, जबलपूर, अलाहाबाद, बनारस, गया, गोमू, पारसनाथ ते धनबाद असा रेल्वेचा मार्ग आहे. येथील स्थानकावर ही रेल्वे आली आहे. त्याबाबत स्थानकातील कर्मचाऱ्यांशी संपर्क साधला असता त्यांनी ही रेल्वे नक्की धनबादलाच सुटणार का, याविषयी काहीच माहिती नसल्याचे सांगितले.

दरम्यान, रात्री दीड वाजता रेल्वे सुटण्याची वेळ अयोग्य आहे. ती बदलण्यात यावी, अशी मागणी महाराष्ट्र रेल्वे व रोड पॅसेंजर्स असोसिएशनचे अध्यक्ष कृष्णराव सोळंकी यांनी केली आहे.


solapur pune pravasi sangatana