तामिळनाडू एस्क्प्रेसच्या आगीत ३२ ठार

31/07/2012 12:58
 

दिल्लीहून चेन्नईकडे जाणार्‍या ‘तामिळनाडू एक्स्प्रेस’च्या एका डब्याला लागलेल्या आगीत सोमवारी पहाटे साखर झोपेत असलेले ३२ प्रवासी जळून खाक झाले. यात २५जण गंभीररीत्या भाजले असून, मृतांची संख्या वाढण्याची भीती आहे.
नेल्लोर स्थानकापासून जेमतेम एक कि.मी. अंतरावर आली असताना एक्स्प्रेसच्या ‘एस-११’ या डब्याला पहाटे ४.१४ वाजता आग लागली. या डब्यात एकूण ७२ प्रवासी होते. आग लागल्याचे लक्षात येताच काही प्रवाशांमध्ये हलकल्लोळ उडाला. डब्यातील प्रत्येक प्रवासी जीव वाचविण्यासाठी धडपडत होता. काहींनी चालत्या गाडीतूनही उड्या टाकल्या. त्यामुळे अनेक जखमीही झाले होते.

आग लागण्यापूर्वी रेल्वेच्या डब्यात स्फोट झाल्याचा आवाज ऐकू आला, असे लेव्हल क्रॉसिंगवरील गेटमनचे म्हणणे
आहे. मात्र शॉर्टसर्किट किंवा डब्यातील ज्वालाग्राही पदार्थामुळेही आग लागल्याची शक्यता आहे, याची समितीमार्फत चौकशी होईल. - मुकुल रॉय, रेल्वेमंत्री

solapur pune pravasi sangatana