दोन दिवसांत २६ नव्या रेल्वे गाड्या

12/11/2011 12:20

नवी दिल्ली। दि. ११ (विशेष प्रतिनिधी)
येत्या दोन-तीन दिवसांत २६ नव्या गाड्या सुरू होत आहेत.
८ गाड्यांचा टप्पा वाढविण्यात आला आहे तर ५पैकी ४ गाड्यांच्या फेर्‍यांची संख्या वाढवून दररोज करण्यात आली आहे. हे बदल येत्या ८ ते १0 दिवसांत होणार असल्याची माहिती केंद्रीय रेल्वेमंत्री दिनेश त्रिवेदी यांनी दिली.
तत्काळचे आरक्षण ४८ तासांवरून २४ तासांवर आणले जात आहे. तत्काळ आरक्षणाच्या तिकिटाची डुप्लिकेट प्रत मिळणार नाही. शिवाय एकदा तिकीट आरक्षित केले तर ते रद्द होणार नाही. यापुढे एका पीएनआरवर अधिकाधिक केवळ ४ पॅसेंजर प्रवास करू शकतील.
सतत होणार्‍या पेट्रोल, डिझेलच्या दरवाढीमुळे रेल्वेला प्रवासी भाड्यामध्ये वाढ करण्याशिवाय पर्याय राहणार नाही, अशा शब्दांत त्रिवेदी यांनी भाडेवाडीचे संकेत दिले.
गरिबांना रेल्वेशिवाय पर्याय नाही. मात्र, अलीकडच्या काळात पेट्रोल, डिझेलच्या भावात सातत्याने वाढ होत आहे. त्याचा भुर्दंड रेल्वेवर पडतो. तेलाच्या दरवाढीच्या विरोधात पं. बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. पुन्हा दरवाढ होऊ नये अशी आम्ही अपेक्षा करतो. परंतु, भाववाढ झालीच तर मला माझे कर्तव्य निभावावे लागेल, असे सांगत त्यांनी येणार्‍या काळात प्रवास भाडेवाढ होण्याची शक्यता वर्तविली.


solapur pune pravasi sangatana