नागरकोईल दरोडाप्रकरणी एका संशयितास अटक

15/11/2011 14:39
सोलापूर। दि. 12 (प्रतिनिधी)

नागरकोईल एक्स्प्रेसवर पडलेल्या दरोडाप्रकरणी एका संशयितास रेल्वे सुरक्षा बलाच्या पोलिसांनी वाकाव येथे शुक्रवारी रात्री अटक केली.
नागरकोईल एक्स्प्रेसवरील दरोडय़ाच्या प्रकारानंतर रेल्वे सुरक्षा बलाचे आयुक्त के. के. शर्मा, सहआयुक्त एम. एम. मुडगरे यांनी वाकाव ते माढा परिसरात गस्त तैनात केली. शुक्रवारी रात्री साडेआठ वाजता वाकाव स्टेशनदरम्यान जवान राजेश मिश्रा, नीलेश कांबळे हे दोघे गस्त घालत असताना आऊटर सिग्नलजवळील झुडपात एक संशयित लपलेला आढळला. फौजदार एस. आर. मीना, दिनेश कांबळे, विक्रमसिंग चाहर, विकास कनोझीया यांच्या मदतीने त्याला ताब्यात घेतल्यावर त्याचे नाव अमर भुरक्या पवार (वय 22, रा. कोर्टी, ता. करमाळा) असल्याचे निष्पन्न झाले. अमर हा सिग्नल तोडण्यात पटाईत आहे. सिग्नल तोडल्यानंतर गाडय़ा थांबल्या जातात, त्याचे साथीदार रेल्वे डब्यावर तुटून पडतात.
जवानांनी त्याला ताब्यात घेऊन कुडरूवाडी रेल्वे सुरक्षा बलाच्या ताब्यात दिले. या पोलिसांनी अमर यास शनिवारी दौंड येथील न्यायालयासमोर हजर केल्यावर त्याला दोन दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश न्यायालयाने दिला. तपास फौजदार एस. एन. कांबळे व पवनकुमार करीत आहेत.

solapur pune pravasi sangatana