नाशिक-मुंबई कुसुमाग्रज एक्सप्रेस सुरु करण्याची ममतादीदींची घोषणा

10/03/2011 11:43

ज्येष्ठ कवी कुसुमाग्रज यांच्या जन्मशताब्दीनिमित्त नाशिक-मुंबई कुसुमाग्रज एक्सप्रेस सुरु करण्याची घोषणा आज रेल्वेमंत्री ममता बॅनर्जी यांनी लोकसभेत केली. राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार सुप्रिया सुळे आणि समीर भुजबळ यांच्या आग्रही पाठपुराव्यानंतर ममतादीदींनी लोकसभेत रेल्वे अर्थसंकल्पावरील चर्चेला उत्तर देताना ही घोषणा केली.  ज्येष्ठ कवी कुसुमाग्रज यांच्या जन्मशताब्दीनिमित्त त्यांच्या नावाने नाशिक-मुंबई एक्सप्रेस सुरु करण्यात यावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे आणि समीर भुजबळ यांनी आज दुपारीच ममता बॅनर्जी यांना एका निवेदनाद्वारे केली होती.


solapur pune pravasi sangatana