पंढरीत नव्या रेल्वेमुळे घरफोडय़ा वाढल्या

19/05/2011 11:16

पंढरपूर : दि. १८

पंढरपूर येथे मिरज-परळी रेल्वे सुरू झाल्यापासून बाहेरील गुन्हेगार येण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे शहरात चो:या, घरफोडय़ा होत आहेत, असा अंदाज शहर पोलिसांनी वर्तविला आहे.

येथील जुना कराड नाका परिसरात घरफोडी करण्याच्या प्रयत्नात असलेल्या तीन चोरटय़ांना पाठलाग करून पकडण्यात आले. हे तीनही चोरटे सांगली जिल्ह्यातून आले होते. गेल्या पंधरा दिवसांपूर्वी येथील बँक ऑफ इंडियाच्या शाखेतून 1क् लाखांची रोकड हातोहात लंपास करण्यात आली. चौकशीदरम्यान पोलिसांनी बँकेत लावण्यात आलेल्या सीसी टीव्ही कॅमे:याची पाहणी केली. या पाहणीत मिरज येथील एका बँकेत चोरी करणारे आरोपी आणि पंढरपुरातील बँकेत चोरी करणारे आरोपी एकच असल्याचे आढळून आले. आंध्रप्रदेश किंवा तामिळनाडू परिसरातील चोरटय़ांनी काही दिवस सांगली परिसरात वास्तव्य केल्याचा पोलिसांचा संशय आहे. पंढरपूर आणि मिरज येथील बँकेच्या चोरी प्रकरणात चोरांची टोळी कार्यरत असल्याचा पोलिसांचा संशय आहे. सांगली-मिरज भागातील चोरटे शहरात फिरत असल्याचा संशयही त्यांना आहे.


solapur pune pravasi sangatana