पश्‍चिम रेल्वे पाठविणार एक कोटी एसएमएस

19/05/2011 17:09

मंबई, दि. १८ (वृत्तसंस्था) - पश्‍चिम रेल्वेतर्फे एक कोटी एसएमएस पाठवायची मोहीम हाती घेण्यात आली आहे. रेल्वे ट्रॅक क्रॉस करणे धोकादायक आहे याचा प्रचार या एसएमएसद्वारे केला जाणार आहे. हे सर्व एसएमएस एका महिन्यात पाठविले जातील. रेल्वने प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले आहे की प्रवाशांमध्ये जागृती करण्याच्या उद्देशाने ही मोहीम हाती घेण्यात आली आहे. रेल्वे ट्रॅक क्रॉस करण्यात कोणकोणते धोके आहेत, हे प्रवाशांना एसएमएसमध्ये सांगितले जाईल. पश्‍चिम रेल्वेने २०१०-११ मध्ये चर्चगेट आणि विरार दरम्यान ८७ पादचारी पूल बांधले असून ६ भुयारी मार्ग बांधले आहेत. याव्यतिरीक्त, तीन नवे पादचारी पूल बांधले असून, तीन पुलांचे काम सुरू आहे.


solapur pune pravasi sangatana