पुलाच्या दुरुस्तीमुळे मध्य रेल्वे पूर्वपदावर

09/08/2011 16:15

भुसावळ, ३० जुलै
भुसावळ-दिल्ली लोहमार्गावरील रावेर ते वाघोड रेल्वे स्थानकादरम्यान खचलेल्या पुलाची दुरूस्ती करून या मार्गावरील एकेरी वाहतूक सुरू करण्यात रेल्वे प्रशासनास यश आले आहे. यामुळे मध्यरेल्वेची उत्तरेकडील वाहतूक पूर्वपदावर आली आहे.
शुक्रवारी सायंकाळी प्रथम डाऊन मार्ग (दिल्लीकडे जाणारा) आणि नंतर सहा वाजता भुसावळकडे येणाऱ्या मार्गाचे कार्य पूर्ण करण्यात आले. भुसावळ विभागाचे अपर मंडल रेल्वे प्रबंधक प्रदीप बारापात्रे यांनी दिलेल्या माहितीनुसार २९ रोजी २६२७ डीएम बंगलोर-नवी दिल्ली कर्नाटक एक्सप्रेस ताशी १० किमी वेगाने या मार्गावरून गाडी सोडण्यात आली. तत्पूर्वी याच गतीने एक रिकामी मालगाडी मार्गावरून चालवून प्रवासी वाहतुकीच्या दृष्टीने मार्ग योग्य झाला असल्याची चाचणी प्रशासनाने घेतली होती. दोन्ही मार्गावरील वाहतूक धीम्यागतीने सुरू असल्याचे बारापात्रे यांनी सांगितले. हा पूल खचल्याने उत्तर भारताशी जोडणाऱ्या सर्व रेल्वेगाडय़ा अकोला, बडनेरा, नागपूर व इटारसीमार्गे वळविण्यात आल्या होत्या. तसेच उत्तर भारतात जाणाऱ्या व येणाऱ्या काही गाडय़ाही रद्द कराव्या लागल्या होत्या.


solapur pune pravasi sangatana