बार्शी बसस्थानकावरून दोन लाखांचे दागिने पळविले

13/08/2011 12:02

बार्शी दि. 12 (प्रतिनिधी)

राखी पौर्णिमेसाठी माहेरी निघालेल्या मंजुषा शंकर करळे (रा. कपूरना प्लॉट, बार्शी) यांच्या पर्समधून साडेसात तोळे दागिने चोरून नेल्याचा प्रकार शुक्रवारी दुपारी 4.30 वाजता घडला. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मंजुषा करळे शुक्रवारी दुपारी शेटफळ येथील त्यांच्या माहेरी जाण्यासाठी बार्शी बसस्थानकावर आल्या होत्या. घरातून निघताना त्यांनी पर्समध्ये छोटय़ा डबीत दोन तोळ्याची सोनसाखळी, अडीच तोळ्याचे गंठण, दीड तोळ्याच्या दोन अंगठय़ा, 11 गॅ्रमचे नेकलेस, 1 ग्रॅमची अंगठी असे एकूण साडेसात तोळे दागिने ठेवले होते.

बसमध्ये चढत असताना चोरटय़ाने पर्सची चेन उघडून दागिने ठेवलेली कॅरीबॅग चोरून नेली. याप्रकरणी त्यांनी शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.


solapur pune pravasi sangatana