बेळगाव-कोल्हापूर रेल्वेमार्ग लवकरच - मुनीयप्पा

07/03/2011 15:05

बेळगाव - माजी केंद्रीय मंत्री बी. शंकरानंद यांचे स्वप्न असलेल्या रेल्वे मार्गाला त्यांच्या निधनानंतर मूर्तस्वरूप मिळणार आहे. बेळगाव-संकेश्‍वर-कोल्हापूर रेल्वेमार्ग बनावा, अशी शंकरानंद यांची इच्छा होती. आता या रेल्वेमार्गाचे काम लवकरच सुरू करणार असल्याचे केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री मुनीयप्पा यांनी सांगितले आहे.

माजी मंत्री बी. शंकरानंद यांच्या अंत्यविधीवेळी केंद्र सरकारचे प्रतिनिधी म्हणून ते बेळगावात आले होते. यावेळी श्री. मुनीयप्पा यांनी बेळगाव-संकेश्‍वर-कोल्हापूर नूतन रेल्वेमार्गाबाबत सरकारचे धोरण स्पष्ट केले. ते म्हणाले, ""रेल्वे मार्गाची पाहणी यापूर्वीच झाली असून कामाला मात्र प्रत्यक्षात सुरवात झाली नाही. पण, शंकरानंद यांचे स्वप्न आपण साकार करणार असून लवकरच रेल्वे मार्गाच्या कामाला सुरवात करणार आहे. तसेच त्यांच्या नावाने एखादी विकासात्मक योजना राबवून त्यांना खरी श्रद्धांजली देण्यात येणार असल्याचे देखील त्यांनी यावेळी सांगितले.''


solapur pune pravasi sangatana