मध्य रेल्वे विस्कळीत

08/02/2012 15:51
ठाणे। दि. ७ (प्रतिनिधी)
सोमवारी शहाड-आंबिवली रात्री उशिराने स्थानकांदरम्यान डाऊन दिशेकडे ट्रॅक डाऊनच्या घटनेमुळे चाकरमान्यांना त्रास झाला असतानाच मंगळवारी सकाळीही जलद मार्गावरील अंबरनाथ लोकल डाऊन दिशेकडेच दिवा स्थानकांदरम्यान अचानक फेल झाल्यामुळे मध्य रेल्वेची डाऊनची वाहतूक खोळंबली.
ही घटना सकाळी ९.५0 च्या सुमारास घडली. या घटनेमुळे जलद गतीच्या डाऊन दिशेकडील वाहतूक खोळंबल्याने अंबरनाथसह कल्याण दिशेकडे जाणार्‍या प्रवाशांचे वेळापत्रक कोलमडले. या लोकलपाठोपाठ येणार्‍या
बदलापूर व अन्य एका लोकलचाही खोळंबा झाला. काही कालावधीनंतर या दोन्ही लोकल दिव्यानंतर धीम्या गती मार्गावर वळविण्यात आल्या. त्यामुळे या लोकल देखील त्यांच्या नियोजित वेळापत्रकाच्या पंधरा मिनिटे उशिराने अपेक्षित ठिकाणी पोहोचल्याची माहिती जनसंपर्क अधिकारी ए. के. सिंग यांनी लोकमतला दिली.
बिघाड झालेली अंबरनाथ लोकल १0.१५ च्या सुमारास डाऊनला अंबरनाथच्या दिशेने धावली.
तरीही दुपारपर्यंत या मार्गावरील वाहतूक १0 मिनिटे उशिरानेच धावत होती. संध्याकाळी उशिराने वेळापत्रकानुसार लोकल धावल्या.

 


solapur pune pravasi sangatana