मध्यप्रदेशात रेल्वे घसरल्याने २५ जखमी

09/05/2011 13:41

विदिशा (मध्यप्रदेश) - मुंबई-प्रतापगड उद्योग नगरी एक्सप्रेसचे सहा डबे आज (सोमवारी) पहाटे रुळावरून घसरुन झालेल्या अपघातात २५ प्रवासी जखमी झाले.

रेल्वेचे प्रशासकिय अधिकारी घनश्याम सिंग म्हणाले, आज पहाटे साडेसहाच्या सुमारास सौरई आणि सुमेर रेल्वे स्थानकादरम्यान हा अपघात घडला. या अपघातात २५ प्रवासी जखमी झाले आहेत. या पैकी पाच जणांची प्रकृती चिंताजनक आहे. घटनास्थळी बचावपथक दाखल झाले आहे. या अपघातामुळे भोपाळ ते दिल्ली मार्गावरील रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली आहे.


solapur pune pravasi sangatana