मध्ये रेल्वेची हेल्पलाईन सुरू

20/11/2012 13:24
मिरज - रेल्वे प्रवाशांची सुरक्षा आणि तक्रारीसाठी मध्य रेल्वेने हेल्पलाईन क्रमांक जाहीर केलेत. रेल्वेत प्रवास करतानाही मोबाईलवरून तक्रार, सूचना करता येईल.

9004414444 आणि 9833331111 हे दोन क्रमांक रेल्वेने सुरू केलेत. पहिला क्रमांक रेल्वे सुरक्षा दल नियंत्रण कक्ष, छत्रपती शिवाजी टर्मिनस (मुंबई) यांचा आहे. दुसरा रेल्वे पोलिस मुख्यालयातील आहे. क्रमांकांवर तक्रार केल्यानंतर त्वरित नजीकच्या रेल्वे पोलिस ठाण्यात संदेश देण्यात येईल. प्रवाशाला मदत पुरवली जाईल. रेल्वेत संशयास्पद वस्तू तसेच स्फोटक साहित्य आढळणे, बेवारस व संशयास्पद साहित्य असणे या कारणास्तव प्राधान्याने हेल्पलाईनचा वापर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तथापि, अन्य तक्रारींसाठीही ते वापरता येतील. महिलांच्या बोगीत पुरुष प्रवासी घुसणे, संशयास्पद व्यक्तींना प्रवाशांनी पकडून ठेवणे, साखळी खेचणाऱ्यांची माहिती पोलिसांना देणे, सिग्नलमधील बिघाडानंतर रेल्वे लुटीचा प्रयत्न आदी सुरक्षिततेच्या कारणास्तवही या क्रमांकांवर मदत मागता येणार आहे.

solapur pune pravasi sangatana