ममता आज रेल्वेमंत्रीपद सोडणार

19/05/2011 17:08

नवी दिल्ली, दि. १८ (वृत्तसंस्था) - तृणमूल कॉंग्रेसच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी या उद्या (दि. १९) केंद्रीय रेल्वेमंत्रिपदाचा राजीनामा देण्याची शक्यता सूत्रांनी वर्तवली आहे. बॅनर्जी या शुक्रवारी पश्‍चिम बंगाल राज्याच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. संयुक्त पुरोगामी आघाडीच्या अध्यक्षा सोनिया गांधी आणि पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्याशी चर्चा केल्यानंतर रेल्वे खाते तृणमूल कॉंग्रेसकडेच राहील असे बॅनर्जी यांनी स्पष्ट केले आहे. पश्‍चिम बंगालमध्ये रेल्वेचे अनेक प्रस्तावित प्रकल्प आहेत, त्यामुळे हे खाते आमच्याकडेच राहावे,असे बॅनर्जी म्हणाल्या.


solapur pune pravasi sangatana