मुंबई-पुणेवर अपघातांची ‘एक्स्प्रेस’ मालिका सुरूच

20/06/2011 11:43

लोणावळा - पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावर तुंगार्लीजवळ (लोणावळा) पोलीस व्हॅन महामार्गाच्या नाल्यात कोसळली. अपघातात दोन पोलीस ठार तर दोन गंभीर जखमी झाले आहेत. चालकाचे नियंत्रण सुटल्याने रविवारी दुपारी दोनच्या सुमारास हा अपघात झाला.

अपघातात ठाण्याचे कॉन्स्टेबल दशरथ मोरे (वय 45), हवालदार शरद चव्हाण (वय 49, दोघे रा. ठाणे) हे जागीच ठार झाले. सहायक फौजदार आर. एच. कोळी व पोलीस कॉन्स्टेबल सचिन चव्हाण हे गंभीर जखमी आहेत. त्यांच्यावर लोकमान्य रुग्णालय चिंचवड येथे उपचार सुरू आहेत.

कोल्हापूरचा आरोपी जगन्नाथ वालिलकरला मुलीच्या लग्नाकरिता ठाणे मुख्यालयातून कल्याण येथे शनिवारी हजर केले होते. त्यास पुन्हा कोल्हापूरात ठाणो पोलीस व्हॅनमधून शनिवारी सोडले. रविवारी सकाळी व्हॅन कोल्हापूरहून ठाण्याला निघाली. द्रुतगती महामार्गावर गाडीवरील नियंत्रण सुटले आणि खालून जाणार्‍या सुमारे 20 फूट नाल्यात पडली. लोणावळा उपविभागीय पोलीस अधिकारी दिलीप शिंदे, निरीक्षक विष्णू पवार, सहा. निरीक्षक एस. आर. गौड, उपनिरीक्षक बी. बी. येडगे, महामार्गचे उपनिरीक्षक दिलीप तळपे, देशमुख आदींनी घटनास्थळी धाव घेतली. निरीक्षक पवार तपास करत


solapur pune pravasi sangatana