मुंबई-लातूर एक्स्प्रेसवर पंधरा दिवसांत दोनदा दरोडा

25/04/2011 16:53

मुंबई-लातूर एक्स्प्रेसमध्ये मलठण व भिगवण स्थानकावर पंधरा दिवसांत दोनदा दरोडा पडला. या दोन्ही दरोडय़ात प्रवाशांना कोयता व तलवारीचा धाक दाखवून दरोडेखोरांनी एक लाख, सत्तर हजार रुपयांचा ऐवज बळजबरीने नेला. ३१ मार्चला रात्री सव्वादोनच्या दरम्यान मलठण रेल्वेस्थानकाचे सिग्नल निकामी करून दरोडेखोरांनी मुंबई-लातूर एक्स्प्रेस थांबवली व महिलांच्या डब्यात शिरूर दागिने व मोबाईल असा पंचवीस हजारांचा ऐवज लुटला. त्यानंतर १५ एप्रिलला भिगवण स्थानकात क्रॉसिंगसाठी मुंबई-लातूर एक्स्प्रेस थांबली असता सात आठ दरोडे खोर रेल्वे इंजिनच्या मागच्या पार्सलच्या डब्यात चढले व त्यात बसलेल्या प्रवाशांना धाक दाखवून १ लाख ४४ हजारांचा ऐवज लुटून नेला हा प्रकार पहाटे अडीचच्या सुमारास घडला. या प्रकाराची खबर प्रवाशांनी कुर्डुवाडी रेल्वे पोलिसांना दिली त्यानंतर दौंड पोलिसांना दरोडय़ाची खबर देण्यात आली.
दौंड रेल्वे पोलीस स्थानकाच्या सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ३१ मार्चला पडलेल्या दरोडय़ा प्रकरणातील तीन संशयित आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून, त्यांच्याकडे चौकशी सुरू आहे.


solapur pune pravasi sangatana