मोबाईलसाठी गमाविला जीव

18/05/2011 11:01

सोलापूर। दि. 17 (प्रतिनिधी)

मोबाईल हँडसेटसाठी अक्कलकोट तालुक्यातील दुधनी येथील शांतप्पा हणमंतप्पा परमशेट्टी (वय 40) या मजुरास जीव गमवावा लागला. झाले असे, शांतप्पा हे पुण्यात मजुरीने काम करीत होते. 11 मे रोजी गावाकडे परत येण्यासाठी ते पॅसेंजरने सोलापूरकडे निघाले. सकाळी सात वा. वाकाव स्टेशनवर पॅसेंजर काही वेळ थांबली. गाडी सुरू झाल्यावर ते पळत येऊन गाडीत चढले. दरवाजात थांबल्यावर त्यांच्या खिशातील मोबाईल हँडसेट खाली पडला. हँडसेट घेण्यासाठी त्यांनी चालत्या गाडीतून खाली उडी मारल्याने कमरेखालील भागास गंभीर दुखापत झाली. कुडरूवाडी लोहमार्ग पोलिसांनी उपचारासाठी दाखल केल्यावर 17 मे रोजी दुपारी मरण पावले.


solapur pune pravasi sangatana