रिधोरेत बसवाहकास मारहाण; सहा हजार लंपास

07/05/2011 11:25

कुर्डूवाडी, दि.६ (वार्ताहर)- रिधोरे येथील पुलावर वाहतुकीची कोंडी झाल्यामुळे गाडी पुढे- मागे घेण्याच्या कारणावरून झालेल्या बाचाबाचीत बस वाहकाच कपडे फाडून खिशातील ६ हजार ७८ रुपये काढून घेतल्याची तक्रार एस.टी. वाहक रामेश्वर अशोक कंुभार (२१ रा. सांजा, जि.उस्मानाबाद) यांनी दिली. ही घटना बुधवारी (दि.४) सायंकाळी ७ वा. घडली.
बोरीवली-उस्मानाबाद ही एस.टी. ( एमएच २० बीएल ०६५४) रिधोरे येथील पुलावर आली असता वाहतुकीची कोंडी झाल्याने वाहक बसच्या खाली उतरून गाडी मागे घेत होता. या कारणावरून मोटरसायकलवरील (एमएच२४ - ९४२९) दोघांबरोबर बाचाबाची झाली. मोटरसायकलस्वार आणि रिधोरेतील ७ ते ८ जणांनी वाहकाला शिवीगाळ केली व दमदाटी करून सरकारी गणवेश फाडून खिशातील ६ हजार ७८ रुपये जबरीने काढून घेतले.
वाहक कंुभार यांनी बार्शी पोलिसात तक्रार दिली होती; मात्र गुन्हा कुर्डूवाडी हद्दीत घडल्याने कुर्डूवाडी पोलिसांकडे वर्ग करण्यात आला आहे. मोटरसायकलस्वार व रिधोरेतील ७ ते ८ जणांवर गुन्हा दाखल झाला असून, तपास पोलीस निरीक्षक हारुण शेख करीत आहेत.


solapur pune pravasi sangatana