रेल मेल लटकलेलेच

05/11/2011 10:44

मुंबई। दि. ४ (प्रतिनिधी)
टपाल खात्याच्या रेल मेल सेवेतील कर्मचार्‍यांच्या मागण्यांबाबत प्रशासनाकडून सकारात्मक चर्चा होत नसल्याने कर्मचार्‍यांनी आजही आपले काम बंद आंदोलन सुरू ठेवले.
टपाल खात्यातील पत्रे रेल्वेतून पुणे, नागपूर, कोल्हापूर व अन्य भागांत पोहोचविण्यासाठी जादा डबा जोडून हा पत्रव्यवहार केला जातो. गेल्या काही महिन्यांपासून आर्थिक कारणे दाखवून टपाल विभागाकडून रेल्वेची रेल मेल सेवा बंद करण्यात येत आहे. मात्र, कामगारांनी हा खासगीकरणाचा डाव असल्याचा आरोप केला आहे.


solapur pune pravasi sangatana