रेल्वे टपाल सेवा बंद

09/11/2011 12:01

सोलापूर। दि. 6 (प्रतिनिधी)
रेल्वे डाक सेवा विभागाचा बेमुदत बंद सुरू असून, रविवारी चौथ्या दिवशीही कामकाज बंद होते. सोलापूर आरएमएसमध्ये शंभर टक्के बंद असल्याचे कर्मचा:यांनी सांगितले.
कार्यालय बंद करणे, रेल्वेमार्फत होणारी टपाल वाहतूक बंद करणे व खासगी ट्रान्सपोर्टला देण्याचा हेतू आहे. त्यामुळे तीन ते चार दिवसात मिळणारी पत्रे 15 ते 20 दिवसांनंतर मिळत आहेत. महाराष्ट्रात काही ठिकाणी आरएमएस ऑफिस बंद करण्याचे प्रयत्न चालू आहेत. महाराष्ट्रातील प्रत्येक शाखा कार्यालयात कामगार कमी असल्याने कायमस्वरुपी कामगारांची भरती करण्यात यावी, जीडीएस टेंपररी स्टेटस व पार्ट टाईम कामगारांना त्वरित कायम करावे, ज्या शाखा कार्यालयात दहा हजारांपेक्षा जास्त काम आहे अशी ऑफिस बंद करू नयेत, जे आरएमएस सेक्शन चालतात ते बंद करू नयेत, 80 सीटर्सची बोगी देण्यात यावी, स्पीड पोस्ट मुंबई येथे एमटीएस कमी पडतात त्या ठिकाणी नवीन भरती करण्यात यावी, एएमपीसी डिव्हीजनला शाखेचा दर्जा देऊ नये यासाठी कोणतेही ऑफिस मर्ज करू नये, या मागण्यांसाठी हा संप पुकारण्यात आला आहे.


solapur pune pravasi sangatana