रेल्वेखाली सापडून बहाद्दूरवाडीचा जवान ठार

16/02/2012 11:08
कोल्हापूर। दि. 15 (प्रतिनिधी)
रेल्वेखाली सापडून जवान ठार झाला. नीलेश रामचंद्र सावंत (वय 24, रा. बहाद्दूरवाडी, ता. वाळवा, जि. सांगली) असे त्यांचे नाव आहे. टेंबलाईवाडी रेल्वे फाटकाजवळ आज दुपारी ही घटना घडली. रेल्वे पोलिसांत घटनेची नोंद झाली आहे.
सावंत हे 2006 मध्ये केंद्रीय राखीव पोलीस दलात भरती झाले होते. सध्या त्यांची नेमणूक गडचिरोली येथे होती. वर्षापूर्वीच त्यांचा विवाह झाला होता. गावची यात्रा असल्याने रजा काढून ते 6 फेब्रुवारीला आले होते. त्यानंतर पुन्हा ते नोकरीवर जाणार होते. आज सकाळी ते अकराच्या सुमारास घरातून बाहेर पडले. दुपारी तीनच्या सुमारास टेंबलाईवाडी रेल्वे फाटकाजवळ त्यांचा मृतदेह आढळला. त्यांच्याजवळील ओळखपत्रावरून ओळख पटली.
सावंत यांच्यामागे आई, वडील, पत्नी, भाऊ असा परिवार आहे.

solapur pune pravasi sangatana