रेल्वेची ट्रॅक्टरला धडक; 5 ठार

19/05/2011 11:13

अकोला: बार्शी टाकळीवरून अकोल्याकडे जाणा:या पॅसेंजर रेल्वेची ट्रॅक्टरला धडक बसून पाच जण ठार झाले. ही घटना अकोला जिल्ह्यातील आळंदा-रूस्तमाबादजवळील रेल्वे गेटजवळ आज पहाटे पाचच्या सुमारास घडली.

पुर्णावरून येणा:या डाऊन 57584 क्रमांकाच्या पॅसेंजरने बार्शीटाकळी ओलांडल्यानंतर अकोल्याकडे येत होती. दरम्यान, आळंदा ते पिंपळखुटा मार्गावरील रेल्वे क्रॉसिंगवरून विद्युत लाईनचे काम करण्यासाठी ट्रॅक्टर (एमएच 30 जे 7396) पाच मजूर घेऊन जात होते. ट्रॅक्टरचालकाला रेल्वेचा अंदाज न आल्याने त्याने रेल्वेपुर्वी गेट क्रॉस करण्याचा प्रयत्न केला.

भरधाव असलेल्या रेल्वेची ट्रॅक्टर रूळावर येताच जबर धडक बसली. या धडकेत ट्रॅक्टरमधील चालकासह सहाही जण दूरवर फेकल्या गेले तर ट्रॅक्टरचे अक्षरश: तुकडे झाल्याने अपघाताची तीव्रता दिसून आली.

अपघातात बाळापूर तालुक्यातील रिधोरा येथील गौतम लक्ष्मण दामोदर (40) व रुपेश गौतम दामोदर (18) या बापलेकासह प्रकाश जयराम दंदी (50), आकाश सुधाकर गवई (18) रा. रिधोरा, चालक सोमय्या पांडीयन सनमुकया तेवर (52) रा. वन्नीकलॅदर जि. तिरुनलवेली (तामिळनाडू) हे ठार झाले तर सुजाता सतीश अंभोरे (25, रा. जुने शहर अकोला) या गंभीर जखमी झाल्या असून त्यांच्यावर जिल्हा सवरेपचार रूग्णालयात उपचार सुरू आहेत.


solapur pune pravasi sangatana