रेल्वेचे आरक्षण आता चार महिने अगोदर

08/02/2012 15:56
प्रतिनिधी , मुंबई
altरेल्वेच्या तिकिटाचे आरक्षण करण्याच्या कालावधीची मुदत तीन महिन्यांवरून प्रायोगिक तत्त्वावर चार महिने करण्याचा निर्णय रेल्वेमंत्रालयाने घेतला आहे. १० मार्च २०१२ पासून त्याची अंमलबजावणी होणार आहे. अर्थात छोटय़ा अंतरासाठी दिवसा धावणाऱ्या ताज एक्स्प्रेस, गोमती एक्स्प्रेस यासारख्या सध्या मुळात आरक्षणाची मुदत ९० दिवसांपेक्षा कमी असलेल्या गाडय़ांचा या निर्णयातही अपवाद राहील. परदेशी प्रवाशांना मात्र नेहमीप्रमाणे वर्षभर आधी आरक्षण करता येईल, असे रेल्वेने कळविले आहे.    

solapur pune pravasi sangatana