रेल्वेचे डबे घसरले; वांबोरीनजीक वाहतूक विस्कळीत

18/05/2011 11:05

श्रीरामपूर दि.15 (प्रतिनिधी)

दौंड-मनमाड रेल्वेमार्गावर वांबोरी रेल्वेस्टेशनजवळ एका मालवाहू गाडीचे दोन-तीन डबे रेल्वे रूळावरून खाली घसरल्याने रविवारी दुपारी 3 वाजेपासून या मार्गावरील रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली आहे. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय झाली. रविवारी दुपारी गुलबर्गा येथून निघालेला रॅक या मार्गावरून जात असताना वांबोरीनजीक रॅकचे तीन डबे रूळावरून घसरले. रेल्वे इंजीन चालकाने प्रसंगावधान राखून मालवाहू गाडी उभी केली. यामुळे सुदैवाने अनूचित प्रकार घडला नाही. घटनेनंतर वांबोरी रेल्वे स्टेशनमास्तरांनी सोलापूर, नगरच्या अधिका:यांना घटनेची माहिती दिली.

या मार्गावरील जाणा:या रेल्वे वाहतूक बंद करण्याच्या सूचना दिल्या. मालवाहू रेल्वे सुरूळीत करण्यासाठी तीन चार तास लागले. सायंकाळी वाहतूक सुरळीत झाली. यामुळे शिर्डी-मुंबई फास्ट पॅसेंजर दोन तास उशीरा धावली. इतर रेल्वेही दुपारपासून रोखून धरण्यात आली होती. रेल्वेचे डबे रूळावरून कसे घसरले? याचे निश्चित कारण समजू शकले नाही.


solapur pune pravasi sangatana