रेल्वेच्या डब्यांमध्ये आता टीव्हीची सोय

02/01/2012 15:16
सोनिपत - खासगी ट्रॅव्हल्सच्या बसगाड्यांमध्ये एकेकाळी टीव्ही असण्याचे अपू्रप होते. ते दिवस आता इतिहासजमा झाले असले तरी रेल्वे खात्याने प्रवाशांच्या मनोरंजनासाठी शताब्दी एक्स्प्रेस गाड्यांमध्ये टीव्ही बसवण्याची योजना पूर्णत्वास नेली आहे.

नव्या वर्षात रेल्वेने ही सुविधा प्रवाशांना भेट दिली असून, कालका शताब्दी गाडीत या योजनेची ट्रायल घेतल्यानंतर आता सर्वच शताब्दी एक्स्प्रेस गाड्यांमध्ये टीव्ही बसवण्यात आले आहेत.  विशेष म्हणजे या सुविधेसाठी प्रवाशांकडून कुठलेही अतिरिक्त शुल्क वसूल करण्यात येणार नाही. रेल्वेच्या अधिका-यांनी दिलेल्या माहितीनुसार शताब्दी गाड्यांमध्ये छोटे टीव्ही सेट लावण्याची योजना ब-याच दिवसांपासून प्रलंबित आहे. नेटवर्किंगच्या अडचणीमुळे ही योजना रखडली होती; परंतु आता एका कंपनीसोबत झालेल्या करारानंतर कालका शताब्दी गाडीत या योजनेची ट्रायल घेण्यात आली आणि त्यानंतर सर्वच शताब्दी

गाड्यांमध्ये टीव्ही लावण्याचे काम पूर्ण झाले आहे. गाड्यांमध्ये सात इंच स्क्रीनचे टीव्ही सेट लावण्यासाठी रेल्वेला सुमारे एक कोटी रुपये खर्च आला आहे.

इतर गाड्यांमध्येही टीव्ही - शताब्दीच्या धर्तीवर इतर मोठ्या गाड्यांमध्येही लवकरच टीव्ही बसवले जाणार आहेत. यात राजधानी एक्स्प्रेसला प्राधान्य देण्यात येईल. त्यानंतर दुरंतो एक्स्पे्रसमध्ये ही सुविधा मिळेल. यासह हॉटेल बुकिंग, टॅक्सी बुकिंग सुविधाही मिळतील.

solapur pune pravasi sangatana