रेल्वेतून पडून केरळचा तरुण ठार

09/06/2011 14:55

लांजा - धावत्या ट्रेनमध्ये ब्रश करीत बसलेल्या तरुणाचा तोल जाऊन पडल्याने मृत्यू झाल्याची घटना आज सकाळी 8 वाजता आडवली रेल्वस्थानकादरम्यान घडली.

याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी - लोणावळा येथील समुद्र मेरीटाईम इन्स्टिट्यूट येथे केरळ येथील पाच तरुण मर्चंट नेव्हीच्या कोर्ससाठी मंगला एक्‍स्प्रेसमधून पनवेलला चालले होते. पनवेल येथे उतरून ते लोणावळ्याला बसने जाणार होते. सहा महिन्यांचे ट्रेनिंग आटपून 22 दिवसांच्या सुट्टीवर हे पाचही तरुण केरळला गेले होते. केरळ येथून आज निघून उद्या (ता. 24) हे पाचजण लोणावळ्याला हजर होणार होते. मंगला एक्‍स्प्रेस आडवली दरम्यान आली असता ब्रश करण्यास बसले होते. याचवेळी या ग्रुपमधील जेरसन राजचा (वय 18) तोल जावून मृत्यू झाला. जेरसन राज हा गाडीतून पडल्यानंतर तत्काळ त्याच्या मित्रांनी मंगला एक्‍स्प्रेस गाडीची आपत्कालीन साखळी ओढली व ट्रेन थांबवली.

त्यानंतर या घटनेची माहिती आडवली स्टेशनमास्तर यांनी लांजा पोलिस ठाण्यात दूरध्वनीवरून दिली.
या घटनेची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक शिवाजी पोफळे यांनी आपल्या सहकाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेतली. जेरसन राज याचा मृतदेह ताब्यात घेवून लांजा ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी आणण्यात आला. जेरसनच्या डोक्‍याला मार लागून कवटी फुटल्याने मृत्यू झाल्याचे घोषित करण्यात आले. दरम्यान जेरसन राज याचा मृतदेह आज रात्री उशिरा नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला
.


solapur pune pravasi sangatana