रेल्वेला 66 लाखांचे उत्पन्न ं आषाढी यात्रेदरम्यान दहा दिवसात 83 विशेष गाडय़ांमधून सेवा

22/07/2011 15:22

 

सोलापूर। दि. 19 (प्रतिनिधी)

मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागाला यावर्षीची आषाढी वारी फायदेशीर ठरली. रेल्वेच्या उत्पन्नात गेल्या वर्षीच्या तुलनेत तब्बल 36.85 टक्क्यांनी वाढ झालेली आहे. यावर्षी आषाढी वारीदरम्यान दहा दिवसात रेल्वेने एक लाख 16 हजार 825 वारक:यांनी प्रवास केला, त्यातून रेल्वेला 65 लाख 75 हजार 225 रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे.

आषाढी वारीनिमित्त महाराष्ट्र, कर्नाटकातून लाखो भाविक पंढरीत येतात. भाविकांची गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वे सोलापूर विभागाने यावर्षी सात ते 16 जुलैर्पयत पंढरपूर स्टेशनला येणा:या एकूण 41 विशेष गाडय़ा व पंढरपूर स्टेशनवरून सुटणा:या 42 अशा एकूण 83 विशेष गाडय़ांची सोय केलेली होती, असे विभागीय वाणिज्य व्यवस्थापक सुशील गायकवाड यांनी सांगितले.

पंढरपूर रेल्वे स्टेशनवरून सुटणा:या एकूण 42 विशेष गाडय़ा सात जुलैला प्रत्येकी एक गाडी लातूर व अमरावती, आठ जुलैला प्रत्येकी एक लातूर व कुडरूवाडी, नऊ जुलैला प्रत्येकी एक कुडरूवाडी, लातूर, अमरावती, 10 जुलैला प्रत्येकी दोन मिरज व पंढरपूर व प्रत्येकी एक दादर, लातूर व कुडरूवाडी, 11 जुलैला पाच गाडय़ा, चार गाडय़ा दौंड, एक गाडी लातूर व एक गाडी नंदेड, 12 जुलैला चार गाडय़ा दौंड, दोन गाडय़ा मिरज, एक गाडी लातूर, 13 जुलैला एक गाडी मिरज, एक लातूर व दोन गाडी दौंड तसेच 14, 15 व 16 जुलैला प्रत्येकी एक दौंड व लातूरला गाडी सोडण्यात आली होती. पंढरपूर स्टेशनला येणा:या 41 विशेष गाडय़ा सात व आठ जुलैला प्रत्येकी एक लातूर व अमरावती, नऊ जुलैला प्रत्येकी एक मिरज, कुडरूवाडी, लातूर व दौंड, 10 जुलैला दौंड व मिरज येथे प्रत्येकी दोन, कुडरूवाडी व लातूर, 11 रोजी पाच गाडय़ा मिरज, चार गाडय़ा दौंड, एक गाडी लातूर, 12 जुलैला तीन गाडय़ा मिरज, नांदेड, लातूर, दादर येथे प्रत्येकी एक, 13 जुलै रोजी दौंड येथे दोन, लातूर व अमरावती येथे एक, 14, 15 व 16 जुलै रोजी दौंड व लातूर येथे प्रत्येकी एक गाडी सोडण्यात आली

गेल्या वर्षी दहा दिवसात 86 हजार 409 वारक:यांनी रेल्वेतून प्रवास केला. यामधून रेल्वेला 50 लाख सहा हजारांचे उत्पन्न मिळाले होते. गेल्या वर्षीच्या तुलनेत भाविकांची संख्या 41.45 टक्क्यांनी वाढलेली आहे. तसेच रेल्वेच्या उत्पन्नात 36.85 टक्के वाढ झालेली आहे. आषाढी एकादशीच्या दिवशी 12 जुलैला रेल्वेला 18 लाख 22 हजार 899 रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे.

 

 


solapur pune pravasi sangatana