रेल्वेवर दरोडा टाकणारी टोळी जेरबंद

31/07/2012 13:02
पुणे। दि. ३0 (प्रतिनिधी)
गेल्या काही दिवसांपासून रेल्वेवर दरोडा टाकून प्रवाशांना लुटणार्‍या टोळीतील ५ जणांना पोलिसांनी अटक केली. गुन्हे शाखा व रेल्वे पोलिसांनी ही संयुक्त कारवाई केली.
सागर दादा कामठे (वय १९, रा. कुगाव, ता. करमाळा), अतुल शिवाजी निंभोरे (वय २२), कैलास मारूती वगरे (वय २२, रा. दोघेही, वांशिंबे, ता. करमाळा), बबलू रामदुलारी गुप्ता (वय ३0 रा. हडपसर), नितीन सुरवसे (वय ३२ रा. हडपसर) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.
महिनाभरापासून जिल्हामध्ये या टोळीकडून रेल्वेवर दरोडे टाकले जात होते. त्यामुळे प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण होते. प्रवाशांचा चाकुचा धाक दाखवून त्यांच्याकडील किंमती ऐवज लुटून दरोडेखोर पळून जायचे. जोधपूर एक्सप्रेस मधील प्रवाशांकडून १ लाख १८ हजार, निजामुदद्ीन एक्सप्रेसकडून १ लाख १0 हजार रुपयांचा ऐवज लुटल्याची नोंद रेल्वे पोलीस ठाण्यामध्ये झाली आहे. मात्र अनेक प्रवाशांनी तक्रार न नोंदवल्याने त्याची नोंद झालेली नाही.
रेल्वेवर दरोडा टाकणारे आरोपी घोरपडी गाव येथील एका पान शॉपजवळ एकत्र जमले असून ते कोल्हापूरकडे जाणार्‍या रेल्वेवर दरोडा टाकणार असल्याची माहिती दरोडा प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरीक्षक सतीश गोवेकर यांना मिळाली होती. त्यानुसार तातडीने हालचाली करून रविवारी मध्यरात्री तिघा आरोपींना अटक करण्यात आली.
रेल्वे पोलिसांनी चोरीला गेलेल्या मोबाइलवरून माग काढला असता हडपसर येथील पानपट्टी व्यावसायिक नितीन सुरवसे याच्याकडे ते मोबाइल असल्याचे निष्पन्न झाले. दरोडेखोरांकडून त्याने ते मोबाइल विकत घेतल्याचे त्याने पोलिसांना सांगितले. त्याला अटक करून रेल्वे पोलिसांनी तपास केला असता बबलू गुप्ता हा दरोडेखोर मिळून आला अशी माहिती रेल्वेचे पोलीस निरीक्षक महेंद्र रोकडे यांनी दिली. दरोडा प्रतिबंधक विभागाचे सहायक निरीक्षक यशवंत फुलवडे, रघुनाथ मोरे, अरूण बुधकर, विलास पालांडे, नामदेव गुजवंटे, नासीर पटेल, दीपक सावंत, दत्तात्रय कोल्हे, देविदास भंडारी व त्यांच्या सहकार्‍यांनी कारवाईत सहभाग घेतला.

दरोडेखोरास सोडले मोकाट...
दौंड येथे प्रवाशांना लुटताना अनिल शिवाजी झोळ या दरोडेखोरास प्रवाशांनी २३ जुलै रोजी पकडून रेल्वे पोलिसांच्या ताब्यात दिले होते. रेल्वे दरोड्यातील प्रमुख आरोपी असणार्‍या झोळवर किरकोळ
चोरीचा गुन्हा दाखल करून दौंड पोलिसांनी त्याला सोडून दिले. त्यानंतर त्याने साथीदारांच्या
मदतीने दोन एक्सप्रसेवर दरोडे टाकून प्रवाशांना लुटले.
पोलिसांनी झोळकडे कसून तपास केला असता तर दरोडेखोरांची
टोळी त्याचवेळी जेरबंद करता आली असती

solapur pune pravasi sangatana