लातूर-नांदेड एक्सप्रेस आता परळीमार्गे

02/04/2010 10:06

 लातूर-नांदेड एक्सप्रेस आता परळीमार्गे

बीड : मुंबई - लातूर - मुंबई एक्सप्रेसला कनेक्शन देणारी लातूर -नांदेड विशेष एक्सप्रेस २ एप्रिलपासून परळीमार्गे शुक्रवारी धावली. या गाडीमुळे कुर्डूवाडी, पुणे, मुंबईसह परभणी, पूर्णा, नांदेडला जाण्या-येण्याची सोय झाली आहे.
मुंबई-लातूर एक्सप्रेसने पुण्याहून लातूरला सकाळी ७.१० मिनिटांनी येणाऱ्या प्रवाशांना तेथूनच ०१०१ लातूर - नांदेड ही एक्सप्रेस ७.२० ला मिळेल.
नांदेड - लातूर सायंकाळी ७.१० वाजता लातूरला पोहचल्यानंतर तेथून रात्री साडे नऊ वाजता सुटणाऱ्या लातूर - मुंबई एक्सप्रेस गाडीचे कनेक्शन मिळेल. या सेवेमुळे कुर्डूवाडी - पुणे - मुंबईला व परभणी - पूर्णा - नांदेडला जाणाऱ्या प्रवाशांची चांगली सोय होईल, अशी प्रतिक्रिया जी.एस. सौंदळे यांनी दिली


solapur pune pravasi sangatana