लोकलमध्ये शॉर्टसर्किट

12/11/2011 12:25
ठाणे। दि. ९ (प्रतिनिधी)
कल्याण रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक १ वर उभ्या असलेल्या कल्याण-सीएसटी या लोकलचा कल्याण दिशेकडील प्रथम श्रेणीच्या मागच्या डब्याच्या मोटर कोचमध्ये आज दुपारी १२.३0 च्या सुमारास शॉर्टसर्कीटने स्पार्क झाला. त्यामुळे ही लोकल स्थानकातच रद्ध करण्यात आली. सुदैवाने या लोकलमध्ये बसलेल्या प्रवाशांना कोणतीही हानी झाली नसली तरीही यामुळे दोन लोकल मात्र रद्द करण्यात आल्या.
कल्याण स्थानकातून दुपारी १२.४७ ला निघाणारी कल्याण-सीएसटी लोकल स्थानकात फलाट क्रमांक १ वर उभी होती. तेवढय़ातच या गाडीतील मागील बाजुच्या डब्यावरील मोटर कोचमधुन अचानक धुर येऊ लागला. या गोंधळामुळे प्रवाशांमध्ये एकच घबराहट पसरली.
घटनेची माहिती लगेचच स्थानक प्रबंधक ओ.पी.करोटीया यांनी वरिष्ठांसह पोलिस यंत्रणेला दिली. काही क्षणातच त्या ठिकाणी अग्नीशमन दलाच्या पथकानेही पोहोचत या आगीवर नियंत्रण मिळवले. आगीचे कारण समजू शक
ले नाही.

solapur pune pravasi sangatana